🕒 1 min read
मुंबई : मध्यंतरी आमिरची मुलगी सोशल मीडियावरून बरीच चर्चेत अली होती मध्यंतरी तिने तिच्या आयुष्यतील बरेच खुलासे सोशल मीडियाद्वारे केले. परंतु आता आमिरची मुलगी दुसऱ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत अली आहे. आमिर खानची मुलगी इरा खान आणि तिचा फिटनेस कोच नुपूर शिखर बर्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करतेय. व्हॅलेंटाईन वीकमध्ये इराने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत रिलेशनशीप जवळजवळ कन्फर्म केलं आहे.
इराने प्रॉमिस डेला नुपूरसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यात ‘माय व्हॅलेंटाईन’ चा हॅशटॅगही देण्यात आला आहे. इराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचन देणं अभिमानाची गोष्ट आहे. नुपूर शिखरने इराला ‘आय लव यू’ म्हणत या पोस्टला उत्तर दिले आहे.
इरा खान अलीकडेच चुलत बहीण झेनच्या लग्नानाला गेली होती. यावेळी कुटुंबासोबत नूपुरदेखील तिच्यासोबत होतो. इराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. रिपोर्ट्सनुसार, इरा आणि नूपूर हे गेल्या सहा महिन्यांपासून डेट करतायेत. लॉकडाऊन दरम्यान दोघे जवळ आल्याच्या बातम्या आल्या आहेत. नुपूर शिखर हा सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमिर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतोय. इरा खानने अद्याप चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले नाही, ती थिएटर आणि दिग्दर्शनात तिची आवड जोपासत आहे.
https://www.instagram.com/p/CLJwGAxAhNv/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- आईला फोन केल्यामुळे फरार कैदी पोलिसांच्या जाळ्यात अडकला
- आदित्य ठाकरेंच्या नावाने सरकारी योजना; मागासवर्गीय युवकांना मिळणार प्रशिक्षण
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
