पुणे : परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पूजा चव्हाण ही रविवारी सोसायटीत आपल्या घरात होती. यावेळी सोबत तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या तरुणीने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आपले जीवन संपवल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे. ‘पुण्यातील तरुणीच्या मृत्यूमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 12, 2021
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- ‘…त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करणार’; भाजप प्रवेशावरील चर्चांना गुलाम नबी आझादांच उत्तर
- गुलाम नबी आझाद यांच्या जागी आता ‘हे’ दिग्गज नेते होणार राज्यसभेचे नवे विरोधी पक्षनेते
- आदित्य ठाकरेंच्या नावाने सरकारी योजना; मागासवर्गीय युवकांना मिळणार प्रशिक्षण
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप


