Share

तुमचं सरकार आहे तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत?, विखे पाटलांचा राज्यमंत्र्यांना संतप्त सवाल

Published On: 

अहमदनगर : राज्यातील शेतकऱ्यांची वीज वितरणाच थकबाकी वाढली आहे. त्यावरुन महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यातच ‘वीज वितरणाची थकबाकी भाजप सरकारमुळे वाढला आहे, असा आरोप ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे () यांनी केला होता. प्राजक्त तनपुरे यांच्या टीकेवर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

तुमचं अपयश आणि पाप झाकण्यासाठी तुम्ही भाजप सरकारवर आरोप करत आहात. आता सरकार तुमचं आहे, तुम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरे यांना केला आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतीचे वीज कनेक्शन कापू नये, वीजबिलं माफ करावी ही मागणी करत शेकडो आंदोलकांच्या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील कोणताही घटक राज्य सरकाच्या कारभारावर समाधानी नाही. तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तरी पूर्ण करा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

दरम्यान, सरकारला फक्त वसुली करायचे माहीत आहे. राज्यातील सामान्य जनतेशी यांना काहीही देणं घेणं नाही असा घणाघाती आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!