🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एकीकडे आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, मात्र दुसरीकडे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा सुद्धा विरोधी पक्ष टिकला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. मात्र आता विरोधी पक्ष संपवून हुकूमशाही राबवली जात आहे का असा प्रश्न जनतेला पडला आहे. सध्या देश विकून भाजप कारभार करत आहे. निरव मोदी, मेहुल चोक्शी यांचे कर्ज माफ होते, मात्र नंतर त्या कर्जाची वसुली सर्वसामान्यांच्या खिशातून होते. जनतेची लूट सुरू असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. याच विरोधात आता काँग्रेसने लढा उभारला असून, आम्ही दडपशाहीला घाबरणार नसल्याचेही नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar । आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा नारायण राणेंचा कट; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप
- Kareena Kapoor | सीतेच्या भूमिकेसाठी करिनाने मागितले १२ कोटी?; नक्की काय म्हणाली करीना कपूर
- Yashomati Thakur | महागाई आणि दडपशाही या मोदीनितीचा निषेध – ॲड. यशोमती ठाकूर
- Ranveer singh | न्यूड फोटोशूटनंतर रणवीरला आली एका अनोख्या शूटची ऑफर; ‘पेटा’ने पाठवले पत्र
- Navneet Rana and Ravi Rane | “ते प्रकरण हलक्यात घेत आहेत” ; राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची पोलिसांकडून मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
