Share

‘भाजप आमचा कायमचा शत्रू नाहीये, भविष्यात काहीही होऊ शकते’, निलम गोऱ्हेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

जळगाव : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.भविष्यात भाजपा व मनसे यांची युती होणार का? या मोठ्या राजकीय प्रश्नांवर खलबतं सुरू झालीत. मागील २० दिवसांत या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट असल्याने, चर्चा अधिकच रंगल्या आहेत.

दरम्यान, या भेटीमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज शुक्रवारी भाजप आणि शिवसेना युतीवर भाष्य केले आहे. ‘राजकारणात कायमचे कोणी कोणाचे शत्रू नसते, आज भाजपशी केवळ मतभेद असले तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू आहे असे नाही. या पक्षांच्या युतीबाबत मी बोलत नाही, मात्र भविष्यात काय होऊ शकते सांगता येत नाही, असे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांच्या भेटीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गोऱ्हे म्हणाल्या की, ‘ते दोन्ही पक्ष स्वंतत्र आहे, ते भेटू शकतात. राजकारण असल्याने यात काहीही होऊ शकते. कदाचित शिष्टाचाराचा भाग म्हणूनही ते एकमेकांना भेटले असतील. भाजपा आणि मनसे एकत्रदेखील येऊ शकतात. मात्र, कार्यकर्त्यांचे काही खरे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

‘जेव्हा भाजपाने आमचा विश्वासघात केल्याचे समजले तेव्हा आम्ही युतीतून बाहेर पडलो. युतीच्या वेळी जे ठरले त्यात विश्वासघात झाल्याने आम्ही इतर पक्षांकडे वळलो. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे साथीदार निवडले. राज्यात आमचे यशस्वी स्थिर सरकार आहे. भाजपाशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी कोणासोबत जावे हा त्यांचा प्रश्न आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!