Share

देशात भाजपला उतरती कळा, तब्बल अर्ध्याहून अधिक देश भाजपच्या विरोधात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 81 जागांपैकी 42 जागांवर कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर 29 जागांवर भाजप आघाडीवर आहे. यावरून झारखंड मध्येही भाजपची पीछेहाट होत असल्याचं दिसत आहे. आधी महाराष्ट्र आता झारखंड या दोन्ही राज्यात भाजपला दणका बसला आहे.

झारखंडमध्ये तर जनतेनेच भाजपला नाकारले असल्याचं दिसत आहे. स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्यांना सर्वाधिक महत्व दिल्यानेचं भाजपला आपली सत्ता गमवावी लागत असल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीतचं नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यामुळे भाजपने स्थानिक मुद्यांना प्राधान्य देण्यापेक्षा राष्ट्रीय मुद्यांना प्राधान्य दिले त्यामुळेचं आज झारखंडमध्ये भाजपला पराभव पाहावा लागत आहे, असे राजकीय विश्लेषकांनी मत मांडले.

महाराष्ट्र पाठोपाठ झारखंडही हातातून गेल्याने भाजपला आता खरचं आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं दिसत आहे. कारण झारखंड मधील पराभवानंतर भाजपचे देशातील वर्चस्व कमी होताना दिसत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी जागा कमालीच्या कमी झाल्या होत्या. त्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रात सत्ता गमवावी लागली.त्यामुळे भाजपला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसत आहे.

दोन वर्षात भाजपला मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर 2017  मध्ये 71  टक्के देशात भाजपला यश मिळाले होते. मात्र, डिसेंबर 2019 मध्ये भाजपकडे फक्त 35 टक्के सत्ता उरली आहे. सध्या गुजरात, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.

दरम्यान दक्षिण भारतात प्रादेशिक पक्षांची राज्यांवर पकड असल्याने भाजपला पक्षाला तिथे हात घालता आलेला नाही. तर दक्षिण भारत वगळता ज्या राज्यांमध्ये सत्ता मिळाली होती, तेथील सत्ता त्यांना टिकवता आली नाही. त्यामुळे 2014 नंतर देशात असलेली मोदींची लाट आता ओसरू लागली असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1209057844336529408?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209055390882656256?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!