जालना : भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत मजल मारली आहे, असे प्रतिपाद माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. परतूर येथे आयोजित बूथ कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी आपापसातील भेदभाव विसरून पुन्हा एकदा पक्ष कार्यासाठी एकत्र यावे आणि पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन लोणीकर यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना केले.
परतूर येथे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून भव्य बूथ कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा प्रभारी मिलिंद पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, गणेश खवणे, ज्ञानेश्वर माऊली शेजुळ, रमेश भापकर, सतीश निर्वळ, प्रकाश टकले, जिजाबाई जाधव, सिध्दीविनायक मुळे यांची उपस्थिती होती.
कृषी सुधारणा विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे : लोणीकर
दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी यावेळी केंद्र सरकारने लागू केलेले कृषी सुधारणा विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नावाखाली काही लोकांनी मोर्चा उघडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशाला बदनाम करण्याचा डाव या लोकांनी आखला आहे. या भूलथापांना देश प्रेमी नागरिकांनी बळी पडू नये. तसेच कृषी सुधारणा विधेयकाची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी लोणीकर यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- आझादांना पराजित करण्यासाठी पवारांनीच ठोकला होता शड्डू, मात्र ते अपयशी ठरले ; वाचा पवारांनी सांगितलेला किस्सा !
- रामजीवी म्हणत आव्हाडांनी उडवली भाजपची खिल्ली !
- काँग्रेस ‘या’ बाबतीत नक्कीच नंबर एकचा पक्ष बनेल; आशिष शेलारांचा टोला
- आंदोलनातूनच देश स्वतंत्र झाला, हे कदाचित मोदी विसरले – राजू शेट्टी
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
