🕒 1 min read
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
देशात 2014 नंतर वातावरण बदलले आहे. जाती, धर्मात विष कालवण्याचे, समाजात तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याचे काम सुरु आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. भाजप सरकार देश रसातळाला घेऊन जात आहे. परंतु पुन्हा एकदा सर्वांना बरोबर घेऊन एकजुटीने देश उभा करण्याचे काम करावे लागणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
