Share

लवकरच राज्यात भाजपची सत्ता येणार, उदयनराजेंचा दावा

Published On: 

सातारा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे. मात्र अशात भाजपचे अनेक नेते हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा करत आहेत. आता ‘ठाकरे सरकारने एका वर्षात काय केलं? हे मला दिसले नाही. लोकांची दिशाभूल केल्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही आणि लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार’ असल्याचा दावा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

साताऱ्यात पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पाहणीसाठी उदयनराजे भोसले पोवई नाक्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पदवीधर निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.’ठाकरे सरकारमध्ये एक वाक्यता नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे, ते कसे येणार आहे, ते विचारू नका’ असं भाकीत पुन्हा एकदा उदयनराजे यांनी वर्तवलं आहे.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्यात अजिबात रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर ते अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांचाच वजनामुळे पडेल, असे मत पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.

तर दुसरीकडे एखादी गोष्ट अनैसर्गिक घडत असेल तर ती फार काळ टिकत नाही हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे हे सरकार अंतर्गत कलहामुळेच पडेल. या निवडणुकीच्या निमित्तानं हे कलह दिसून आले आहेत. त्यातूनच हे सरकार पडणार असून त्यासाठी आम्हाला काही करण्याची आवश्यकता नसल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!