Share

‘भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर ईडी कारवाई करणार का?’, जयंत पाटलांचे आव्हान

Published On: 

अहमदनगर : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करण्यासाठी ईडी, सीबीआय व आयटी यंत्रणांना हाताशी धरून भाजप कारवाई करण्यास सांगत आहे. याचवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या गैरकारभाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. असे असेल तर आम्हीही अशा नेत्यांच्या आणि त्यांच्या गुन्ह्यांची माहिती देऊ, त्यांच्यावर या यंत्रणांनी कारवाई करून दाखवावी,’ असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काहीही चुकीचे केले नाही. पण त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे काम सुरुये. असेच इतर मंत्र्यांच्याबाबतही घडत आहे. जे खरे मनी लॉण्ड्रींग करीत आहेत, त्यांना सोडून देण्यात येत आहे. आणि जे करत नाहीत, त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले जात आहे. अशा प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, मात्र ते भाजपात गेले आहेत, त्यांचे काय झाले? राज्यात असे अनेक लोक आहेत, जे सध्या भाजपत आहेत. ज्यांना ईडीने नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांच्या चौकशीचे काय झाले? असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!