Share

Allocation of funds | भाजपने शिंदे गटाला निधी देण्यातही डावललं!, शिवसेनेची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री जरी शिंदे गटाचे असले तरी सत्तेत भाजपचे वर्चस्व दिसून येते. मंत्रिपदावरुन शिंदे गटातील आमदार नाराज होते. आता निधी वाटपाबाबत भाजपने शिंदे गटाला डावलल आहे. शिंदे गटातील मंत्र्यांपेक्षा भाजप मंत्र्यांना अधिक निधी देण्यात आला आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यांना तब्बल ११ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शिंदे गटाच्या मंत्र्यांसाठी केवळ ६ हजार ३०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री नाराज आहेत.

शिंदे गटाला कमी निधी मिळाल्यानंतर सुनिल प्रभू यांनी खोचक टीका केली आहे. शिंगे गट निधीसाठी गेला मात्र काय मिळालं, याचा बोध घ्यावा, असे प्रभू यांनी म्हटले आहे. दुध का दुध पाणी का पाणी होत आहे, असेही ते म्हणाले.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. सत्ताधारी विधानसभेच्या परीसरात येताच. विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. “आले रे आले गद्दार आले”, “५० खोके एकदम ओके!”, “रोख घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!” अश्या घोषणा विरोधकांनी लगावल्या. यावेळी धनंजय मुंडे चांगलेच जोशात होते.

महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावेळी अधिवेशनात आणखी गदारोळ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!