🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला आरोपी बनवण्याची तयारी ईडी करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. ईडीकडून बुधवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीचा असा दावा आहे की, जॅकलिनला सुरुवातीपासूनच माहित होते की तिचा बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि खंडणीखोर आहे. दरम्यान ईडीने एप्रिलमध्ये जॅकलिनची सात कोटींहून अधिक रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
जॅकलिनला होऊ शकते अटक
या प्रकरणात ईडीने अद्याप न्यायालयात आरोपपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे जॅकलिनला सध्या तरी अटक होऊ शकत नाही. पण न्यायालयीन सुनावणीनंतर मात्र अटक होऊ शकते. तसेच सध्या जॅकलिन फर्नांडिसला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाहीये.
काय आहे प्रकरण?
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात दिल्ली पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला होता. दिल्ली ईओडब्ल्यूने ऑगस्टमध्ये त्या एफआयआरची चौकशी सुरू केली. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचीही चौकशी सुरू केली होती. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांच्या पत्नींना तुरुंगातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने 200 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सुकेशवर आहे. सुकेश कधी स्वतःला पंतप्रधान कार्यालयाशी तर कधी गृहमंत्रालयाशी संबंधित अधिकारी म्हणवून घेत असे. तर या फसवणुकीत तिहार तुरुंगातील अनेक अधिकारीही सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.
जॅकलिन दिले महागडे गिफ्ट्स
जॅकलीन सुकेशला डेट करत होती असा तिच्यावर आरोप आहे. यादरम्यान सुकेशने जॅकलिनला अनेक महागडे गिफ्ट्स दिले आहेत. यामध्ये लाखोंच्या दागिन्यांबरोबरच क्रॉकरी, ४ पर्शियन मांजरी आणि एक घोडाही भेट दिलेला आहे. या पर्शियन मांजरीची किंमत 9 लाख रुपये असून घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Amol Mitkari । मोहित कंबोज हे कोणाच्या चड्डीचा नाडा आहेत हे सर्वांना माहिती आहे; अमोल मिटकरींचा खोचक टोला
- NCP vs Mohit kamboj | “नादाला लागल्यावर आम्ही नांगरासकट बैल लावतो”; राष्ट्रवादीच्या नेत्याचा कंबोज यांना इशारा
- Aditya Thackeray | मोहित कंबोज यांच्या ट्विटवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल म्हणाले, “लोकशाही आहे…”
- National Anthem । अधिकारी कर्मचारी आणि नियुक्त पोलीस पथक यांनी मंत्रालयात केले समूह राष्ट्रगीत गायन
- Sunil Prabhu | शिवसेनेचा व्हिप सर्वजण पाळणार – सुनिल प्रभू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
