Share

Aditya Thackeray | मोहित कंबोज यांच्या ट्विटवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल म्हणाले, “लोकशाही आहे…”

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील ईडी कोठडीत आहेत. अशात भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं भाकीत केलं आहे. यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागल्या आहेत. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज यांना टोला लगावला आहे.

आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना मोहित कंबोज यांच्या ट्वीचवर प्रश्न विचारण्यात आला. मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीचा एक नेता तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यांचा रोख विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याकडे आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, लोकशाही आहे ठोकशाही नाही.

गद्दारांना तिथे बसण्याचा अधिकार नाही- आदित ठाकरे

राज्यातील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच अधिवेशन आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. व्हिप आमचाच आहे म्हणजे शिवसेनेचा, त्यामुळे गद्दारांना तिथे बसण्याचा अधिकार नाही, असे आदित ठाकरे म्हणाले.

हे सरकार लोकशाही विरोधी-

आदित्य ठाकरे म्हणाले “आज आम्ही सदन प्रस्ताव मांडला, पण तो मंजूर झाला नाही. हे सरकार लोकशाही विरोधी सरकार आहे. बेईमानांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न राज्यात आहे. मात्र यांचे फक्त राजकारण सरु आहे. त्यामुळे यांना जनतेचा आवाज जात नाही.”

व्हिप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच –

हे सरकार घटनेच्या विरोधात काम करत आहेत. जर आपण कायद्यात बघितले तर व्हिप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे. हे जे ४० गद्दार आहेत. यांचा ना व्हिप आहे, ना तिथे बसण्याचा नैतिक अधिकार आहे. पक्षाची कारवाई चालू राहते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वरळी मतदार संघात भाजप दहीहंडी साजरी करणार आहे, यावर आदित्य ठाकरे म्हणाले. चांगली गोष्ट आहे. वरळी सर्वांना आवडायला लागली आहे. प्रत्येकाने तिथे उत्सव साजरे करावे, आम्ही कुठेही चॅलेंज करणार नाही. आम्ही पोरकटपणा करणार नाही. सगळ्यांनी सण साजरा करवा, आणि राजकारण आणू नये ही आमची भावणा आहे.

मंत्रिमडळात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळले –

आदित्य ठाकरे म्हणाले, “मंत्रिमडळात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळले आहे. अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. खऱ्या सत्ताधारी गद्दार सोडून, ज्या चांगल्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.”

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!