भोपाळ : जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून भारतात देखील कोरोनाचा मोठा कहर पाहायला मिळत आहे. सर्वांनी मिळून या लढाईत एकजूट दाखवली तरच यावर विजय मिळेल असं असताना देखील राजकीय नेते मात्र आपापसात भांडण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
नुकतीच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी माहिती पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
भाजपने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. भाजपने रविवारी दुपारी हे निवेदन गुन्हे अन्वेषण विभागाला दिलं होतं. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने संध्याकाळी कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कमलनाथ यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी कोरोनावरून भाजपवर टीका केली होती. आता कोरोनाला जगात ‘इंडियन कोरोना’ नावाने ओळखले जाईल, असं कमलनाथ यांनी म्हटलं होतं. तसेच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांनी केला होता. त्यांचं हे विधान आक्षेपार्ह असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देवमाणूस : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देणार रतन टाटा आधार
- चित्रपटात भूमिकेसाठी फोन केलेल्या दिग्दर्शकाला गागुंलीने दिले ‘असे’ उत्तर
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये जडेजा असेल एक्स फॅक्टर ; इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाची भविष्यवाणी
- बांग्लादेशच्या तमीम इक्बालने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
- निलंबनासाठी वडील आणि मी जबाबदार ; पृथ्वी शॉने केला खुलासा


