Share

मुंबईकरांना करात माफी; मग औरंगाबादकरांवर अन्याय का? मनसेचे घंटानाद आंदोलन..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: मुंबईमध्ये पाचशे चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून मालमत्ता करात माफी देण्यात आली आहे. मात्र औरंगाबादेत गुंठेवारी भागात राहणाऱ्या नागरिकांवर बेटरमेंट चार्ज वाढवून मनपाने अन्याय केलेला आहे. शहरातील सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बुधवारी (दि.५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर रस्त्यावर उतरत जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. नवनियुक्त मनसे शहराध्यक्ष सुमित खांबेकर(Sumit Khambekar) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.

राज्य सरकारने मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर औरंगाबाद शहरातील मालमत्ताधारकांनाही पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कराला माफी मिळावी अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांकडून होत आहे. औरंगाबादेतील गुंठेवारीतील घरांचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही. मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका शिवसेनेवर होत आहे. पालकमंत्र्यांची पोकळ आश्वासने आम्हाला नकोत असा आक्रमक पवित्रा आज मनसेने घेतला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने केलेल्या मागण्या अशा आहेत.

यात खुल्या जागेसाठी प्रति चौरस प्रमाणे १३१८ रुपये आणि बांधकाम झालेल्या जागेसाठी अधिकच दोन टक्के शहर विकास शुल्क आकारले जात आहे. मात्र शहराचा अजून कुठलाही विकास झालेला नाही. त्यामुळे विकास शुल्काचा बोजा सामान्य नागरिकांवर टाकू नये. मुंबईत ज्याप्रमाणे कर्जमाफी करण्यात आली. त्याच प्रमाणे औरंगाबाद शहरात देखील २०१९ पर्यंतचा मालमत्ता कर माफ करण्याचा वा गुंठेवारी भागातील नागरिकांसाठी हप्त्याची सोय करुन देण्यात यावी. या मागण्या मनसेतर्फे करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर जनआंदोलन उभारू असा इशाराही यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला.

काय आहे विकास शुल्क?

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामांना परवानगी देतांना नवीन वर्षापासून दहा टक्क्यांनी विकास खर्च (बेटरमेंट चार्ज) वाढविण्यात आल्याची माहिती नगररचना विभागातील गुंठेवारी कक्षप्रमुख तथा उपअभियंता संजय चामले यांनी दिली. गुंठेवारी नियमितीकरणासाठीही दहा टक्के बेटरमेंट चार्ज वाढविण्यात आल्याने सामान्य नागरिकांवर कराचा बोजा पडणार आहे. १ जानेवारीपासून गुंठेवारीच्या दाखल होणाऱ्या संचिकांसाठी दहा टक्के बेटरमेंट चार्ज लावला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!