मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केल्याचे समजते. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरु आहे. हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. तर यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी कारवाईची मागणी केली आहे.
मादक पदार्थांच्या विळख्याने देशाची तरुण पिढी बरबाद व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे कितीही मोठ्या बड्या धेंडांची मुले यात सहभागी असली तरी त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. NCB ड्रग्स पुरवठ्याच्या मुळाशी जाऊन हे रॅकेट नेस्तनाबूत करेल अशी खात्री आहे. असे ट्वीट भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले आहे.
मादक पदार्थांच्या विळख्याने देशाची तरुण पिढी बरबाद व्हायला वेळ लागत नाही.
त्यामुळे कितीही मोठ्या बड्या धेंडांची मुले यात सहभागी असली तरी त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे.
NCB ड्रग्स पुरवठ्याच्या मुळाशी जाऊन हे रॅकेट नेस्तनाबूत करेल अशी खात्री आहे. pic.twitter.com/V4pI1QzhKM— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 3, 2021
दरम्यान दरम्यान आता एनसीबी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिर्डीत नवं शहर वसवण्याच्या घोषणेवर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले…
- ‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम
- ‘जलसंपदाचे कुठलेली कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही’, मंत्री जयंत पाटलांची स्पष्टोक्ती


