Share

भाजप पहिल्याच यादीत सुजय विखेंना उमेदवारी, दिलीप गांधींचा पत्ता कट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आघाडीला धक्का देत भाजपात प्रवेश करणारे सुजय विखे यांची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे. विखे यांना उमेदवारी देताना विद्यमान खा दिलीप गांधी यांच्या पत्ता कट करण्यात आला आहे.

सुजय विखे यांच्या प्रवेशानंतर भाजपकडून उमेदवारी मिळणे निश्चित मानले जात होते. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, सुजय विखे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरचे आमदार संग्राम जगतापांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 15 जागांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी हे पुन्हा एकदा नागपूरमधून लढणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी

एकूण 182 उमेदवार घोषित

पंतप्रधान नरेंद्र मोदी – वाराणसी

अमित शहा – गांधीनगर

राजनाथसिह – लखनऊ

महाराष्ट्रातील उमेदवार

नंदुरबार – हीना गावित

अहमदनगर – डॉ. सुजय विखे

अकोला – संजय शामराव धोत्रे

बीड – प्रीतम गोपीनाथ मुंडे

भिवंडी – कपिल मोरेश्वर पाटील

चंद्रपूर – हंसराज गंगाराम अहिर

धुळे- डॉ. सुभाष रामराव भामरे

गडचिरोली-चिमूर अशोक महादेव नेते

जालना – रावसाहेब दादाराव दानवे

लातूर – सुधाकरराव श्रृंगारे

उत्तर मुंबई – गोपाल शेट्टी

उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन

नागपूर – नितीन गडकरी

रावेर – रक्षा खडसे

सांगली- संजयकाका पाटील

वर्धा – रामदास चंद्रभानजी तडस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!