Share

भाजपच ठरलं; संजय उपाध्याय लढवणार राज्यसभेची निवडणूक

Published On: 

मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपने राज्यसभा मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली. उपाध्याय २२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील, असंही पाटील यांनी सांगितले आहे.

संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपने घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून रजनी पाटील यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी सोमवारी पाटील यांच्या नावाची घोषणा केली. राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. रजनी पाटील या काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची मुदत २२ सप्टेंबरला संपणार आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा होती. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक, संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!