Share

सत्तेच्या जोरावर नोंदणीपुर्व लस मिळते की काय? भाजप नेत्याची टीका

Published On: 

ठाणे : राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. दुसरीकडं, वेळीच राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर अटकाव घालण्यासाठी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्यासह देशभरात १६ जानेवारी पासून कोरोना लसीकरण सुरु करण्यात आलं. यासाठी नोंदणी आवश्यक असते.

मात्र, एकही ठिकाणी काळा बाजार, फसवणूक सुरु असल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी चक्क कोरोना लसीच्या बॉटल्सच गहाळ झाल्या. लसीकरणासाठी शासनाने प्राधान्यक्रम ठरवला आहे. आता हे सर्व नियम तोडून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे.

ही धक्कादायक माहिती समोर येताच भाजपने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपच्या अवधूत वाघ यांनी देखील शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘महाराष्ट्रात कोरोना लशीचा काळाबाजार चालला आहे की काय? सत्तेच्या जोरावर नोंदणीपुर्व लस मिळते की काय?’ असे सवाल अवधूत वाघ यांनी केले आहेत. भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी, ‘हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे, यातून शिवसेनेची मानसिकता काय आहे याचा हा ढळढळीत पुरावा आहे,’ अशी घणाघाती टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!