Share

‘सरकार असेल थंड तर आम्ही पुकारू बंड’; भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक

Published On: 

मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असं म्हणत निशाणा साधला आहे. कायदे कमजोर नाहीत, कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय, असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या म्हणतात, अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना वर्धा मधील आर्वी येथे घडली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्याच्यात ती गर्भवती राहिली आणि आरोपीच तिला गर्भपातासाठी घेऊन गेला. आर्वी पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि धक्का बसला की, काही कवट्या, हाडं, गर्भपिशव्या त्या ठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथे सुरू होता. किती अवैध गर्भपात तिथे केले गेले? किती मुलांना मारलं गेलं? किती चिमुकल्यांची हत्या केली गेली? हे सांगता येणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, सांगलीच्या म्हैसाळमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. या सगळ्या प्रकरणाचं मूळ जर पाहिलं तर ते कुठे ना कुठे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे जातं आहे. माझ्याकडे अशा प्रकारे अत्याचार झालेल्या अनेक मुलींची यादी आहे. यामुळेच कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दात ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!