नवी दिल्ली: देशात कोरोना (Corona) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. देशभरातील ३० राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत होते. यावेळी मोदींनी कोरोना तसेच ओमायक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर महत्वाच्या सूचना तसेच काही महत्वाचे निर्णय सांगितले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन (Lockdown) लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन (Containment Zone) तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.
तसेच कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिली आहे. मोदी म्हणाले की, केंद्राने राज्यांना २३ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याचा वापर करुन अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटं लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- उत्तर प्रदेशातील भाजप मंत्र्यांच्या राजीनामा सत्रावर शरद पवार म्हणाले, “गोव्यातही हे…”
- ‘मराठीत फलक लावल्याने काय होणार?’; अभिनेता सुमित राघवनचा प्रश्न
- छत्रपती शिवरायांचे दर्शन होणार; स्वारी लवकरच संभाजीनगरला धडकणार, आ. अंबादास दानवेंनी दिली माहिती
- “दीदींच्या प्रकृतीत सुधारणा.. ; बहीण आशा भोसले यांनी दिली प्रतिक्रिया
- ‘मला जबाबदारीतून मुक्त करा’; पालकमंत्री पदावरून हसन मुश्रीफांचं वक्तव्यं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

