मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपने राज्यसभा मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली. उपाध्याय २२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील, असंही पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका करत एका जुन्या निर्णयाची आठवण करुन दिली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेली राज्यसभेच्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, प्रमोद महाजन यांचं निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती.
पण, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. राजकारणात एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे, पण भाजपने ही प्रथा मोडलीये, असे स्पष्ट मत यावेळी बाळासाहेब थोरात यांनी यावेळी मांडले आहे. तर या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून रजनी पाटील यांना उमेदवारी दिलीय.
काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी सोमवारी पाटील यांच्या नावाची घोषणा केली. राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. रजनी पाटील या काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची मुदत २२ सप्टेंबरला संपणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच ठरलं; संजय उपाध्याय लढवणार राज्यसभेची निवडणूक
- चिपी विमानतळ सुरू करण्यास DGCA ची परवानगी; पुन्हा श्रेयवाद रंगणार ?
- तमाशा ही लोककला, परंतु बाजारू लोकांना ती कशी कळणार; सदाभाऊ मिटकरींवर भडकले
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- मुनगंटीवार म्हणाले, बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत…; शिवसेनेनं दिलं ‘हे’ प्रत्युत्तर


