मुंबई : आज दिवसभरातील मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आज बंडखोर आमदार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांचे पुतळे जाळून शिवसैनिक त्यांचा निषेध करत आहेत. आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक पार पडली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत बोलताना बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.
या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत म्हणाले कि, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. 2019 साली भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यामुळे त्यांनी युती तोडली. ही गोष्ट एकनाथ शिंदेना माहित आहे. जर 2019 साली भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले असते. त्यावेळी भाजपने शब्द पळाला असता तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाने बेईमानी केली म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि आता त्याच भाजपसोबत ते जायला निघाले आहेत, असं संजय राऊत या कार्यक्रात बोलताना म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे येतात का? त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही उद्धजींना सांगू, हे येणार नाहीत. हे भाजपच्या अधीन गेले आहेत. त्यांना चहा आणि जेवणातून अफू आणि गांजा देत आहेत. त्या बधिरतेने ते सर्व बोलत आहेत. तसेच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, हे महाराष्ट्रात येऊन सांगा. राज्यात येऊन सांगा की महाविकास आघाडीतून बाहेर पडा आमच्याकडे ४० आमदार आहेत. नक्कीच उद्धव ठाकरे त्यांचा कौल मान्य करतील, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

