Share

Atul Bhatkhalkar : “बापाचं नाव कशाला? कधी स्वतःच्या नावावर मतं मागून बघा” ; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल  

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. यावेळी शिवसेनेने पाच महत्वाचे ठराव मंजूर केले असून त्यापैकी बाळसाहेब ठाकरे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही असा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर निवडणूक लढवा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी दोनतृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे संघटना मजबूत करण्याबरोबरच सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेवर कोणाचा अधिकार असावा यावरूनही चांगलाच वाद सुरु आहे. “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर निवडणूक लढवा” उद्धव ठाकरेंच्या या विधानावर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे.  “बापाचं नाव कशाला? कधी स्वतःच्या नावावर मतं मागून बघा ना उद्धव ठाकरे साहेब… मिळतील का मतं?”, असे अतुल भातखळकर म्हणाले.

 

शिवसेनेचे पाच ठराव-

बंडखोरांना त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, मी मध्ये पडणार नाही. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या बैठकीत पाच ठराव मंजूर झाले आहेत. त्यापैकी पहिला ठराव म्हणजे सर्व अधिकार हे पक्ष प्रमुखांकडे असतील. म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे असतील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहणार त्यामुळे बंडखोर आमदारांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. तिसरा ठराव म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार असतील. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणाला वापरता येणार नाही. सेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. असे पाच ठराव या बैठकीत मंजूर झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!