Share

नांदेडमध्ये भाजपाला खिंडार, भास्करराव पाटील खतगावकरांकडून काँग्रेस प्रवेशाची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधील दुफळी उघड झालीये. माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता आगामी काळातील निवडणुकीची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

बिलोली येथे तीन दिवसांपूर्वी गुरुवारी भास्करराव पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही. पुढे आपण काय निर्णय घ्यावा यावर विचार करण्यासाठी ही बैठक खतगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. खतगावकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, आम्ही कोणत्याची पक्षांशी बांधील नाहीत, अशी भूमिका या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माडंली.

त्यानंतर आज रविवारी त्यांनी भाजप सोडण्याचे जाहीर केले. भास्करराव पाटील यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. खतगावकर यांच्या या निर्णयाने देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत खातगावकरांनी अंग काढून घेतल्याचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.

भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. पाटील हे तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार व राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या बहीण स्नेहलता यांचे खतगावकर हे पती आहेत. सात वर्षांपूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवत त्यांनी कॉंग्रेस सोडली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!