पंढरपूर – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. राज्यातील बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे.भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे.
भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तआज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडी चे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
राज्यभरातील अनेक मंदिरांसमोर भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत असून पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव पायरीला लागून असलेल्या भिंतीवरून उड्या मारून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत सणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर
- मोठी बातमी ! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने धाडली नोटीस
- सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल- पैठण शहराध्यक्ष निमेश पटेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

