🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. ‘बीजेपी के कार्यकर्ताओं की तरफ आंख दिखाओगे तो वो आंख सलामत नही रहेगी’ अशी धमकी केंद्रातील मोदी सरकारच्या एका मंत्र्याने जाहीर सभेमध्ये दिली आहे. केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी काल गुरुवारी गाझीपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना हे वादग्रस्त वक्तव्य केले.
काय म्हणाले मनोज सिन्हा ?
कोणी पुर्वांचलचा गुन्हेगार ज्याची गाझीपूरची सीमा ओलांडण्याची लायकी नाही. त्याने येऊन कार्यकर्त्यांशी नजर भिडवल्यास त्याचा डोळा धड राहणार नाही, भाजपा कार्यकर्ता गुन्हे आणि भ्रष्टाचाराला मुळापासून उखडण्यासाठी तयार आहेत. जर त्यांच्यावर कोणीही बोट दाखवल्यास त्याचे बोट पुढील ४ तासांत धड राहणार नाही याची ग्वाही देतो.अशी उघडउघड धमकी त्यांनी दिली.
Union Minister Manoj Sinha in Gazipur: BJP ka karyakarta apradh-arjit dhan aur bhrashtachar ko zameendoz karne ko taiyar hai aur main kehna chahta hun ki agar kisi ki ungli BJP ke karyakarta ki taraf dikhi to bharosa rakhiye 4 ghante mein vo ungli salamat nahi rahegi.(18/04/2019) pic.twitter.com/qzht3f35ky
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 19, 2019


