Share

वडिलांच्या चितेला अग्नी देताना चिराग पासवान यांना आली चक्कर

Published On: 

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पार्थिव शनिवारी पंचत्वात विलीन झाले. पाटणा येथील दिघा घाट येथे जनार्दन घाटावर राजकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र व लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी त्यांना मुखाग्नी दिला. मुखाग्नी देताना चिराग चक्कर येऊन पडला. यावेळी उपस्थितांनी त्यास सावरले आणि अंत्यसंस्काराचे कार्य पार पाडले.

74 वर्षीय रामविलास पासवान हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. शनिवारी पाटणा येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

रामविलास पासवान यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे, तेजस्वी यादव, मंत्री मंगल पांडे, खासदार रामकृपाल यादव, महेश्वर हजारी यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!