Share

जायकवाडीत ‘टपटर्ड पोचर्ड’ पक्षी मृतावस्थेत आढळले, बर्डफ्ल्युची शंका

Published On: 

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयाच्या दगडी पिचिंगवर काही पक्षी मंगळवारी (दि.१६) दुपारी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबतीत पक्षीमित्र दिलीप भगत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मृतावस्थेत सापडलेले पक्षी ‘टपटर्ड पोचर्ड’ या जातीचे विदेशी पक्षी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदरील पक्षी बर्डफ्ल्युने मेले असावेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

रविंद्र जोशी यांनी मंगळवारी सोशल मिडियावर धरणाच्या पिचिंगवर मृतावस्थेत पडलेले काही पक्ष्यांचे चित्र प्रसारीत केले होते. या बाबत पक्षीमित्र दिलीप भगत यांच्याशी संपर्क केला असता त्या पक्ष्यांची त्यांनी ओळख पटवत ते पक्षी ‘टपटर्ड पोचर्ड’ या जातीचे असल्याचा खुलासा केला व हे पक्षी गेले तीन ते चार दिवसापुर्वी पाण्यातच मयत झालेले असावे अशी शंका देखील भगत यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. ‘टपटर्ड पोचर्ड’ हे पक्षी अटालांटीक महासागराकडून जायकवाडी धरणाकडे दरवर्षी बहुसंख्येने येतात मात्र संबधीत विभागाकडून आलेल्या विदेशी पाहुणे पक्ष्यांची कुठलीच निगा राखली जात नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे भगत म्हणाले व या पक्ष्यांचा मृत्यु बर्डफ्ल्युने झाल्याची शंका भगत यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली असून संबधीत विभागावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मृतावस्थेत सापडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पक्ष्यांना देखील बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झालेला असावा असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. मृत विदेशी पक्ष्यांना उत्तरीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाला की अन्य कारणामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!