पाटणा- बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. सत्तेचे सिंहासन मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष चांगलाच जोर लावत आहेत.रोज नवे आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं.बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जाहीर सभेत पाकिस्तान आणि ओवेसीचं नाव घेतलं जातंय. बिहारमध्ये आता भाजपला ओवैसी दिसत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ‘मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात भाजप कट रचत आहे. त्यांना निवृत्त करून भाजप आमदाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे’, असा आरोप ओवैसी यांनी केलाय.
‘बिहारमधील जनता महायुतीच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात भरडली गेली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकिर्दीत अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. ते गरीबीत ढकलले गेले आहेत. उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्री बनवा तरच बिहारच्या जनतेला न्याय मिळेल’असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल‘
- कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन आज होणार ऑनलाईन मेळावे
- देशातील कोणत्याही नागरिकाला सीएएचा धोका नाही- भागवत
- भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावंच लागेल – मोहन भागवत
- ‘कोरोनाचं संकट नसतं तर आज शिवतीर्थावर शिवसैनिकांचा महापूर आला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

