🕒 1 min read
नागपूर : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून याचा मोठा परिणाम भारतात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विजयादशमीच्या निमित्ताने राजकीय जुगलबंदी दरवर्षी पाहायला मिळते मात्र यंदा काहीसं वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नागपुरात बोलताना भागवत यांनी मोदी सरकारचे कौतुक केले. स्वदेशी, स्वावलंबन, नवीन शिक्षण धोरण या मुद्दयांवर सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची पाठ थोपटली. शासनाचे कामकाज पारदर्शक असून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची क्षमता सरकारमध्ये आह असं म्हटलं आहे.भागवत यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर देखील भाष्य केले. भागवत म्हणाले, चीनने या अगोदरदेखील वेळोवेळी जगाला आपल्या विस्तारवादी मनोवृत्तीची ओळख दिली आहे. आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, आपली अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे. या दिशेने आपल्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची पावलेदेखील पडत आहेत, असे दिसून येते.
कलम ३७० २०१९ मध्ये हटवण्यात आले, त्याचबरोबर न्यायालयाने ९ नोव्हेंबर रोजी राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. हे निर्णय संपूर्ण देशाने संयमाने स्वीकारले. त्याचबरोबर देशातील कुठल्याही नागरिकाला सीएएचा धोका नसल्याचे भागवत म्हणाले. देशात सीएएविरोधी निदर्शने झाली. निषेध नोंदवण्यात आल्यामुळे देशात तणाव निर्माण झाला. पण देशातील कोणत्याही नागरिकाला सीएएचा धोका नाही. सीएएवर अधिक चर्चा होण्यापूर्वी, यावर्षी देशावर कोरोनावर संकट आल्याचे भागवत म्हणाले.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मेळावे घेणाऱ्या सर्वानीच यंदा मेळावे ऑनलाईन करण्यावर भर दिला आहे.भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा यांचा भगवान भक्तिगडावरील मेळावा यंदा ऑनलाईन होणार आहे. पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. तर आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी सावरकर सभागृहात फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दसरा मेळावा आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षण मुद्यावर कंगनाचे मोठे विधान
- कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन आज होणार ऑनलाईन मेळावे
- देशातील कोणत्याही नागरिकाला सीएएचा धोका नाही- भागवत
- फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत, त्यांना शुभेच्छा : एकनाथ खडसे
- राष्ट्रवादीने विश्वासात न घेतल्यास ‘या’ निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
