Share

‘मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून याचा मोठा परिणाम भारतात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विजयादशमीच्या निमित्ताने राजकीय जुगलबंदी दरवर्षी पाहायला मिळते मात्र यंदा काहीसं वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी सावरकर सभागृहात फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दसरा मेळावा आहे. शिवसेनेसाठी आजचा दसरा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिला दसरा मेळावा आहे. कोरोनाचं संकट नसतं तर आज शिवतीर्थावर शिवसैनिकांचा महापूर आला असता, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात लढल्या जातील.मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे भाकीत खासदार राऊत यांनी केलंय. अनेकजण म्हटले होते की, 11 दिवसांत सरकार पडेल. गणपतीला सरकारचे विसर्जन होईल, पण आता दसरा आला आहे. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे, आता त्यांच्याच खाली बॉम्ब फुटतील, असे म्हणत भाजपाला इशारा दिला.

मुख्यमंत्र्यांनी सीमोल्लंघनाची तयारी केली असून आज ते शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधतील, असं राऊत यांनी म्हटलं. यंदाच्या दसरा मेळाव्याला मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये पक्षाचे काही पदाधिकारी आणि मुंबईतील शिवसेनेचे आमदार यांचा समावेश असल्याचं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!