Share

‘कोरोनाचं संकट नसतं तर आज शिवतीर्थावर शिवसैनिकांचा महापूर आला असता’

Published On: 

मुंबई- : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून याचा मोठा परिणाम भारतात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विजयादशमीच्या निमित्ताने राजकीय जुगलबंदी दरवर्षी पाहायला मिळते मात्र यंदा काहीसं वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी सावरकर सभागृहात फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दसरा मेळावा आहे. शिवसेनेसाठी आजचा दसरा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचं संकट नसतं तर आज शिवतीर्थावर शिवसैनिकांचा महापूर आला असता, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी सीमोल्लंघनाची तयारी केली असून आज ते शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधतील, असं राऊत यांनी म्हटलं. यंदाच्या दसरा मेळाव्याला मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये पक्षाचे काही पदाधिकारी आणि मुंबईतील शिवसेनेचे आमदार यांचा समावेश असल्याचं राऊत म्हणाले.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मेळावे घेणाऱ्या सर्वानीच यंदा मेळावे ऑनलाईन करण्यावर भर दिला आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी झाला असून असून सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा यांचा भगवान गडावरील मेळावा यंदा ऑनलाईन होणार आहे. पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!