नवी दिल्ली : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या डान्सचे लाखो लोक दिवाने आहे. तिच्या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी अनेकांची तिथे गर्दी होत असते. सपनाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. मात्र यावेळी तीची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे.
लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. तिच्यावर डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे. अॅडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शांतनू त्यागी यांनी वॉरंट जारी केलं असून त्याची सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सपना विरोधात १४ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये सपनासोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख करण्यात आला होता. आता याप्रकरणात लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. या कारणामुळे आता सपनाच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.
काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यातर्फे परळीत दिवाळीनिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीने ठुमके लावले होते. या कार्यक्रमात तुफान गर्दी झाली होती याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल


