Share

घोषणेला अर्थ नाही, संसदेत जर….. ; प्रकाश आंबेडकरांचं मोठ वक्तव्य

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज तीन कृषी कायदे (Farm Law) मागे घेण्याची घोषणा केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आम्ही शेतकऱ्यांना कृषी कायदे समजाऊन सांगण्यात कमी पडलो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी देखील मागितली आहे. त्याच सोबत सर्व शेतकऱ्यांना आता परत घरी जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्याची घोषणा केल्यानंतर या कायद्यांना प्रचंड विरोध झाला. शेतकरी संघटनांनी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लेच्या सीमेवर ठिया मांडला होता. अनेक स्तरांवरून या कायद्यांना विरोध करण्यात येत होता. मात्र आता शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक काळ सुरू न ठेवता यावर तोडगा म्हणून अखेर मोदी सरकारने हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा मोठा निर्णय आज घेतला.

दरम्यान, हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा जरी करण्यात आली असली तरी देखील जोपर्यंत याचा निर्णय संसदेत होत नाही तोपर्यंत या घोषणेला काही अर्थ नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र हे कायदे संसदेत मागे घेतल्या गेले तरच त्याला अर्थ आहे. दुसरे असे की याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची याचिका आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!