मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्याने याचा मोठा फटका मराठा समाजाला बसला असून तीव्र नाराजीव्यक्त केली जात आहे. मराठा समाजाने विविध आंदोलने आणि निदर्शने देखील सुरु केली आहेत.
दरम्यान, कोरोनाची स्थिती असल्याने मराठा समाजाने संयम पाळावा असं आवाहन राज्य सरकार आणि मंत्र्यांतर्फे करण्यात येत होतं. मराठा समाजाला संयमाचं आवाहन करणारे हेच नेते कोरोना स्थितीला बगल देऊन केंद्र सरकारविरोधात महागाई आणि इतर कारणांवरून आंदोलन करत आहेत, मोर्चे करत आहेत. या नेत्यांच्या आंदोलनामध्ये अनेकदा ना तोंडाला मास्क असतो, ना सोशल डिस्टंसिंग ! यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक बळावण्याची शक्यता असते. यावरूनच मराठा आक्रोश मोर्चाचे नेते नरेंद्र पाटील यांनी काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं आहे.
नरेंद्र पाटील हे सोलापूरमधील आक्रोश मोर्चा नंतर आता नवी मुंबईत बाईक रॅली काढणार आहेत. जर काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई होत नसेल तर आमच्या आंदोलनाला अडथळे का ? असा सवाल करत त्यांनी बाईक रॅलीवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. सोलापूर व अन्य ठिकाणी मराठा आक्रोश मोर्चाच्या कार्यर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नाना पटोले अशोक चव्हाण, भाई जगताप यांच्यावर गुन्हे दाखल केले का? याबाबत पोलीस महासंचालकांनी माहिती द्यावी, असं नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.
तर, आम्हाला परवानगी नाकारली तरी आम्ही बाईक रॅली काढणारच आहोत. येत्या 18 जुलै रोजी नवी मुंबईतून बाईक रॅली काढली जाणार आहे. 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता ऐरोली ते माथाडी भवन वाशीपर्यंत बाईक रॅली काढली जाईल, अशी माहिती देखील नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दहावीची परीक्षा म्हणजे करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा’, धनंजय मुंडेंकडून शाबासकीची थाप
- ‘जे काँग्रेस नेते भाजपला घाबरतात त्यांना पक्षातून हाकलून द्या’, राहुल गांधींची सडेतोड भूमिका
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘राज्य सरकारचा गूण दहावी निकालाच्या वेबसाईटला लागला, दोन्हीही ठप्पच!’ भाजपचा टोला
- ‘श्रीपादचे छिंदम’चाळे सुरूच! टपरी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; अॅट्रॉसिटी दाखल


