🕒 1 min read
सोलापूर : यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु वीज पुरवठा नियमित होत नसल्याने पिकांचे नुकसान होताना शेतकरी पाहत आहेत. सरळ सरळ शेतीतील पिके पाणी असूनही वीज पुरवठ्यामुळे करपून जात असताना पाहायला मिळत आहेत. कृषीपंपाची वाढत्या थकबाकीमुळे महावितरण सोलापूर जिल्ह्यात वसुली करत आहे.
तसे पाहिले तर राज्य सरकारचे जे काही निर्देश आहेत त्यानुसार शेतकरी थकीत रक्कम फेडत असतो, तरी देखील शेतकऱ्यांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी वीज बिल भरत असूनही त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नसेल तर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न केला जात आहे. जर सोलापूर जिल्ह्यात विद्युत पुरवठा नाही झाला, तर ७ मार्च रोजी चक्काजाम आंदोलन करू असा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.
महावितरणाने रोहीत्रावरील थकबाकी पूर्ण केल्यावर वीज पुरवठा नियमित करू असा निणर्य सांगितला आहे. शेतकरी हळूहळू उसणे पैसे घेऊन वीजबिल भरत आहेत परंतु महावितरणाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असताना दिसत आहे. रात्री अवेळी वीज पुरवठा केल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आंदोलन सुरु आहे. कित्येक शेतकऱ्यांना रात्रपाळी करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. दिवसा १० तास वीज पुरवठा करावा असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. अन्यथा आम्ही ७ मार्च ला चक्क्काजाम आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
