Share

मोठी बातमी : भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादी आणि सेनेत करणार प्रवेश ? 

Published On: 

पुणे – काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महत्वाचं विधान केलं होतं. ‘एकत्र आले तर भावी सहकारी’ असं विधान करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिलं. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एका बाजूला सेना-भाजप पुन्हा जवळ येण्याची शक्यता वर्तविली जात असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आता भाजपला खिंडार पाडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

भारतीय जनता पक्षातील काही आमदार हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही आमदार हे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

विशेष म्हणजे शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला मोठं खिंडार पाडण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. भाजपच्या काही आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात असून पुढील आठवड्यात हा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!