Share

मोठी बातमी! शाहू महाराज-संजय राऊत यांची भेट, उद्धव ठाकरेंची महाराजांशी फोनवर चर्चा…

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून आता संपूर्ण चित्र स्पष्ट असतानाही मात्र अद्यापही या विषयावर वाद संपताना दिसून येत नाही. राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. एकीकडे हे सुरु असतानाच आता खुद्द छत्रपती संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी संभाजीराजेंवर टीका केली आहे. टीका करतानाच शाहू महाराजांनी शिवसेनेची बाजू घेतल्याने आता नवा वाद उभा राहिला आहे. संभाजीराजेंना उमेदवारी काही कारणांनी देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द मोडल्याची टीका होणेदेखील चुकीचे आहे असे मत शाहू महाराजांनी बोलून दाखवले होते. आता यादरम्यानच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीला पोहोचले होते.

संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शाहू महाराज यांची भेट घेण्यासाठी न्यू पॅलेसमध्ये पोहोचले होते. विशेष बाब म्हणजे त्यांच्यासोबत राज्यसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवारदेखील सोबत उपस्थित होते. संजय राऊत थेट भेटीला पोहोचले असल्याने या भेटीत नेमकी त्यांच्यात काय चर्चा होणार याची उत्सुकता, सर्वांनाच होती.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो.आज बऱ्याच वर्षांनी कोल्हापुरात आलो आहे. उद्धव ठाकरेंचा सकाळी मला फोन आला, ते म्हणाले, कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचं एक वेगळं नातं आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब सुद्धा आले होते. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक कार्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद राहू देत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”

“आम्ही महाराजांकडे एका आत्मीयतेने आलो आहोत. वयाने आम्ही त्यांच्यापेक्षा फार लहान आहोत. पण या घराण्याविषयी, कुटुंबाविषयी, शाहू महाराजांविषयी प्रबोधनकारांपासून एक वेगळं नातं आहे, त्या नात्याननेच आम्ही इथे येतो. याच्यात कोणतंही राजकारण नाही एवढंच सांगतो,” असे संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!