Share

मोठी बातमी: 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना मार्चपासून मिळणार कोरोनाची लस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी कोरोना लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, मार्चपासून 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लसीकरण सुरू होईल. सात दिवसांपासून 188 जिल्ह्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, लस आली असली तरीही नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आज देशात दोन लस उपलब्ध झाल्या आहेत. 80 ते 85 लाख आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्सना लस देण्यात आली आहे. सरकारचे यश सांगताना त्यांनी 20 ते 25 देशांना लसीचा पुरवठा केल्याचीही माहिती दिली.

आरोग्यमंत्री म्हणाले की, सध्या देशात विविध पातळ्यांवर 18 ते 20 लसींवर काम सुरू आहे. त्यातील काही लसी पुढील काही महिन्यांत येऊ शकतात. ते म्हणाले की, भारताने सर्वांसाठी आरोग्यसेवेचे स्वप्न शक्य करून दाखवले आहे. ते म्हणाले की, प्राचीन वैद्यकीय पद्धतीचा वापर करून आपण देशात आरोग्याचे एक मोठे नेटवर्कही उभारू शकतो.

कोरोनाच्या आकडेवारी बोलताना ते म्हणाले की, देशात आतापर्यंत 1,09,16,589 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1,06,21,220 जण बरे झाले आहेत. देशात सध्या बरे होण्याचा दर 97.29 टक्के आहे. भारतात जगातील सर्वात कमी मृत्युदर (1.43 टक्के) आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!