🕒 1 min read
मुंबई :- कोरोनाची कमी झालेली संख्या आता जगभरात झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोना वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मध्ये प्रवास करत असताना मास्क बंधनकारक आहे.
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांना मास्क लावणे बंधनकारक आहे. जे प्रवाशी मास्क लावणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक आहे.
नियम मोडल्यास भरावा लागेल दंड –
केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने २२ मार्च ला कोरोना संदर्भात जरी केलेल्या नियमांचे पालन केले जात आहे. मास्क न लावाता कोणी प्रवाशी प्रवास करत असेल तर त्या, त्या प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
रेल्वे बोर्डाने स्थानक परिसरात देखील प्रवाशांना मास्क लावणे सक्तीचे केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील मास्क लावणे बंधनकारक आहे. यासंदर्भात जनजागृती मोहीम देखील राबवण्यात येणार आहे. रेल्वेने सर्व निर्बंध हटवले होते, पण कोरोनाचे संकट परत आल्यामुळे रेल्वेही निर्बंध वाढवत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

