Share

मोठी बातमी! केतकी चितळेला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :-  ठाणे सत्रन्यायालयाने केतकीला २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. केतकी चितळे ला आज ठाणे कारागृहातून नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. २०२० साली केतकी चितळेने २ समाजात तेढ निर्माण होईल अश्या प्रकारचे वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. याप्रकरणी नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात २०२० साली अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सप्टेंबर २०२१ साली ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा जामीन अर्ज देखील फेटाळून लावला असल्याने आता या प्रकरणात केतकीला ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती नवी मुंबई पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. केतकी सोबत आणखी ३ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघांचा शोध नवी मुंबई पोलिस घेत आहेत. उद्या न्यायालयात केतकीला हजर करण्यात येणार असून तिच्या पोलिस कोठडीची मागणी नवी मुंबई पोलिस करणार आहेत.

वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे चर्चेत-

केतकीने आत्तपर्यंत अनेक वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्या आहेत. याकारणांमुळे ती नेहमी चर्चेत असते. केतकीने याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे तिची पोस्ट तेव्हा देखील बरीच चर्चेत होती. तसेच एका समाजाची लोक मोफत मुंबई पाहायला मिळते म्हणून येतात, अशी पोस्ट देखील केतकीने केली होती. त्यामुळे केतकी नेहमी चर्चेत असते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!