🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील ६७वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बंगळुरूने आयपीएल गुणतालिकेत प्रथम स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सचा ८ गडी राखून पराभव केला. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. बंगळुरूला प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी सामना जिंकण आवश्यक होता. बंगळुरूने या सामन्यात गुजरातवर सहज विजय मिळवला. त्यामुळे विराटचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही टिकून आहे. सामन्यात सलामीवीर विराट कोहली (७३) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (४४) यांच्या फलंदाजीच्या बळावर बंगळुरूने गुजरात टायटन्सवर ८ गडी राखून विजय मिळवला. यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून विराटकडून ज्या खेळीची अपेक्षा होती, ती खेळी तो अखेर खेळला. विराटने ५४ चेंडूत ७३ धावा फटाकवल्या. या खेळीत विराटने ८ चौकार आणि २ षटकार ठोकले. बंगळुरूने सामना जरी जिंकला असला तरी ते अजून प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाही हे मात्र पक्क नाही. त्यांचे प्लेऑफ मध्ये जाण्याचे स्वप्न हे शनिवारी होणाऱ्या दिल्ली विरुद्ध मुंबई या सामन्यानंतर ठरेल.
सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नाबाद ६२ धावा आणि शेवटच्या क्षणी येऊन राशिद खानने १९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे गुजरातच्या संघाने बंगळुरू समोर १६८ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात बंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने दमदार प्रदर्शन करत बंगळुरूला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
Points table of IPL 2022. RCB moves to No.4 position in the table. pic.twitter.com/bzP7Piz7Vy
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 19, 2022
गुणतालिकेतील समीकरण
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्याच्या निकालावर बंगळुरूचं भवितव्य अवलंबून आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली तर बंगळुरू सहज प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र हा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला तर बंगळुरूचं आव्हान संपुष्टात येईल. कारण दिल्लीने या सामन्यात मुंबईवर विजय मिळविल्यास त्यांचे १६ अंक होतील. अशावेळी नेट रनरेटच्या आधारावर दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये जाईल. कारण बंगळुरूचा रनरेट दिल्लीपेक्षा खराब आहे.
बंगळुरूच्या विजयाने दोन संघांचे आव्हान संपुष्टात
गुरुवारी खेळल्या गेलेल्या बंगळुरू विरुद्ध गुजरात सामन्यात बंगळुरूच्या संघाने बाजी मारल्याने पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांच आव्हान संपुष्टात आलंय. त्या अगोदर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

