Share

मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

Published On: 

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल(Prabhakar Sail) यांचा काल (१ एप्रिल ) मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने साईल यांचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दरम्यान आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, तेथे आपण हजर असल्याचा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही केली होती. किरण गोसावी यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

दरम्यान अनेक धक्कादायक दावे करणाऱ्या प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे. त्यांनी आर्यन खान प्रकरणात एक व्हिडिओही सादर केला होता. ज्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते.

महत्वाच्या बातम्या:

“ही महाविकास आघाडी नव्हे तर नाराज तिघाडी”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र

“…जुमलेबाज़ मोदी सरकार”, महागाईच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचे टीकास्त्र

“कोतेपणालाही लाज वाटावी असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन…”, मेट्रो लोकार्पण निमंत्रणावरून भातखळकरांचा टोला

मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली- अजित पवार

सर्व निर्बंध उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिली ‘पाडवा भेट’- संजय राऊत

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!