मुंबई : भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून महाविकास घडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच ही महाविकास आघाडी नव्हे तर नाराज तिघाडी आहे, असेही उपाध्ये म्हणाले आहेत.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मागील २ वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली राज्याच्या मुलभूत प्रश्नांना बगल दिली. शेतकरी आत्महत्या, वीज कनेक्शन कापली जातायेत, एसटी कर्मचारी हवालदिल झालाय. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद तसाच कायम आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी आणि सर्वात महत्त्वाचं भ्रष्टाचार याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. राज्याच्या विकासासाठी आघाडी बनवली असा दावा करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये रोज काही ना काही नाराजी असल्याचं समोर येते.’ तसेच नाराजी दूर करण्यातच मुख्यमंत्र्यांचा वेळ जात असेल तर जनतेचे प्रश्न सोडवणार कोण?, असा सवालही उपाध्येंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “आयत्या बिळावर नागोबा तसं आयत्या मेट्रोवर…”, लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- सर्व निर्बंध उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिली ‘पाडवा भेट’- संजय राऊत
- IPL 2022: पंजाब विरुद्ध नाणेफेक जिंकत किंग खानच्या संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय ; कागिसो रबाडाचे पंजाबमध्ये पर्दापण!
- मुंबई मेट्रो लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रण नाही!


