Share

मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: “कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे…” अशा शुभेच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar ) यांनी ट्वीट करत दिल्या आहेत.

वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरू होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढीपाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

कोरोनाचं संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनाबाबतचे निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. या काळात अवलंबलेली स्वच्छता,सुरक्षिततेची सवय वैयक्तिक,सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया! निरोगी,बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया! असे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

सर्व निर्बंध उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिली ‘पाडवा भेट’- संजय राऊत

“आयत्या बिळावर नागोबा तसं आयत्या मेट्रोवर…”, लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

IPL 2022: खतरनाक! रसेलच्या ‘मसल पॉवर’ने पंजाब गार; केकेआरने ६ विकेट्सने सामना जिंकला

IPL 2022: उमेश यादवने उडवली पंजाबची विकेट! केकेआर १३८ धावांचा पाठलाग करणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!