Share

सर्व निर्बंध उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिली ‘पाडवा भेट’- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लागोपाठ दोन वर्षे गुढीपाडव्याचा सण कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदाच्या हिंदू व मराठी नववर्षाची सुरुवात उत्तम झाली आहे. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (३१ मार्च) केली. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य ऐकले आहे. तसेच सर्व निर्बंध उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला पाडवा भेट दिल्याचेही ते म्हणाले आहेत.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘गुढीपाडवा हे विजयाचे आणि नवनिर्मितीचे प्रतीक मानले जाते. जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोनासारख्या महामारीचा महाराष्ट्रातील जनतेने समर्थपणे मुकाबला केला आणि या भयंकर आपत्तीवर विजय मिळवला म्हणून यंदाच्या गुढीपाडव्याला नक्कीच विशेष महत्त्व आहे. भूतकाळात जे झालं, ते घडून गेलं. कोरोनासारख्या संकटाने दोन वर्षांत सगळ्या जगाची घडी विस्कटून टाकली. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. असंख्य कुटुंबांतील कर्तेधर्ते कोरोनाने हिरावून नेले. प्रचंड मनुष्यहानी झाली आणि आर्थिक नुकसानीची तर मोजदादच नाही. मात्र, अखेर मनुष्य जिंकला आणि कोरोना पराभूत झाला. कोरोनाचे अरिष्ट हे मानवनिर्मित होते की नैसर्गिक याचा छडा लागायचा तेव्हा लागेल, पण तूर्तास मानवजातीने या संकटावर मात केली हे तर वास्तव आहे. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा जल्लोषात साजरा होईल.’

दरम्यान,पुढे ते म्हणाले की,‘आज महाराष्ट्रातील आणि देशातील जनताही कोरोनाचा विनाश करून भयमुक्त आणि संकटमुक्त झाली आहे. त्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साथ प्रतिबंधक कायद्याने कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते, ते उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला ‘पाडवा भेट’च दिली. जुने विसरून नवीन कार्याचा प्रारंभ करणारा दिवस म्हणून आपण गुढीपाडव्याकडे पाहतो. या दिवसापासूनच वसंत ऋतूचे आगमन होते. निसर्गचक्रानुसार शिशिरातील पानगळ संपून वृक्षवल्लींना नवी पालवी फुटू लागते. जीवसृष्टीत होणारा हा महत्त्वाचा बदल गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसा आहे. एका अर्थाने गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा वाढदिवसच. कारण सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाने जो दिवस निवडला होता, तो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवाच. हिंदू धर्मात कोणतेही मंगलकार्य सुरू करण्यासाठी जे साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत, त्यातील पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!