Share

“कोतेपणालाही लाज वाटावी असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन…”, मेट्रो लोकार्पण निमंत्रणावरून भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबई मेट्रोच्या 2-ए (Metro 2A) आणि मेट्रो ७ या मार्गिकेचे लोकार्पण आज (२ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटना अगोदरच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. त्यात या सोहळ्याला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणच देण्यात आले नाहीये. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे.

“कोतेपणालाही लाज वाटावी असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन आहे”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही ट्वीट करत म्हटले की, “देवेंद्रजी मुंबई मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिले तर मीडियाचा सगळा झोत त्यांच्यावर राहणार हे मुख्यमंत्र्यांना चांगलचं माहितीये. शिवाय मुंबई मेट्रो चे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत हे सगळ्या मुंबईकर जनतेला ठाऊक आहे. आयत्या बिळावर नागोबा..तसं आयत्या मेट्रोवर…” असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचं नाव नसल्याने भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परंतु या निमंत्रण पत्रिकेत विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांचे नाव असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

“ही महाविकास आघाडी नव्हे तर नाराज तिघाडी”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली- अजित पवार

सर्व निर्बंध उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिली ‘पाडवा भेट’- संजय राऊत

“आयत्या बिळावर नागोबा तसं आयत्या मेट्रोवर…”, लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!