Share

मोठी बातमी! ‘बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेणार’, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

Published On: 

पुणे : बैलगाडा शर्यतीवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकार या शर्यतीवरून एकमेकांकडे बोट करत आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, मेळावे घेतले जात आहेत. या दरम्यान, भाजप आ. गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यात बैलगाडा शर्यत भरवत राजकीय धुरळा उडवून दिला. मात्र, त्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पडळकर यांच्यासह ४१ जणांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा मालकांवर विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. गुन्हे मागे घेतले जातात म्हणून कोणी कायदा हातात घेऊ नये. कायदा, सुव्यवस्था व शांतता टिकवण्याचे काम सर्वांनी करावे. या पुढच्या काळात नव्याने गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटलांनी केलेय.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा विषय काढला. यावेळी वळसे पाटील म्हणाले, ‘बैलगाडा शर्यती सुरु होण्याबाबत कोणीही राजकारण करू नये. सर्व पक्ष व नेते यांचा बैलगाडा शर्यतींना पाठिंबा आहे. राज्य व केंद्र सरकारही आपल्या बरोबरच आहे. सर्वोच्च न्यायालयात असलेली सुनावणी व निर्णय झाल्याशिवाय बैलगाडा शर्यतचा प्रश्न सुटणार नाही. त्यापूर्वी केंद्र सरकारने संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळले पाहिजे. सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे तातडीने सुनावणी होण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अर्जही दाखल केला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!