Share

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जावयाला सीबीआयने घेतले ताब्यात

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना काही वेळापूर्वी सीबीआयने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. वरळी मधून त्यांना ताब्यात घेतले असल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती नसल्याने त्यांनी गौरव चतुर्वेदी यांचे अपहरण करण्यात आले असल्याची तक्रार त्यांनी वरळीतील पोलीस चौकीमध्ये धाव घेतली होती.

वरळीतील सी फेस परिसरात त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार देशमुख कुटुंबियांनी सीबीआयवर जाणून बुजून अडचणीत आण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप केला असल्याचे समजत आहे. गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्याच्या अगोदर त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा कोतेही समन्स सीबीआय कडून देण्यात आले नव्हते. असे देखील त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.

अनिल देशमुख प्रकरणात यापूर्वी गौरव चतुर्वेदी यांचं नाव यापूर्वी कधीही आलं नव्हतं. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी हे देशमुख यांच्या वरळी इथल्या सुखदा इमारत इथं आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर वरळी परिसरातच सी-लिंक जवळ त्यांची गाडी थांबवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी सीबीआयच्या एकूण 10 जणांच्या टीमनं ही कारवाई केली असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!